आरोग्यताज्या घडामोडीमुंबई

आरोग्य सेवेवरील खर्च कमी, औषध झाली स्वस्त

सामान्य जनतेला सरकारचा मोठा दिलासा

मुंबई : रोज नव्या आजराला कितीतरी लोकांना सामोरे जावे लागते. प्रदूषण, अपुरी झोप, धावपळ, टेन्शन, कधीही काही पण खाणे या सगळ्याचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो मग तो कोणत्या तरी आजाराच्या रूपाने बाहेर पडतो. हे आजार बरे करण्यासाठी मिळणारी औषधे ही खूपच महाग असतात त्यामुळे आता केंद्र सरकारने ही औषधे स्वस्त केली आहेत.

वर्ष २०२१ च्या आकडेवारीनुसार भारतात ७.४१ कोटी मधुमेहाचे रुग्ण होते तर हृदयरोगी आणि यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्यासुद्धा जास्त असून केंद्र सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या निर्णयानुसार या आजारांच्या उपचारांसाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ४१ औषधांच्या आणि सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत आणि आता त्यामुळे त्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

अनेक औषधे स्वस्त होणार
डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आणि एनएनपीए (नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी) यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, अँटासिड्स, मल्टीविटामिन्स आणि अँटीबायोटिक्स स्वस्त होणार आहेत. यासोबतच सर्व फार्मा कंपन्यांना औषधांच्या कमी किमती केल्याची माहिती डीलर्स आणि स्टॉकिस्ट यांना तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक औषधांच्या किमती जनतेला परवडणाऱ्या असल्या पाहिजे याच्यामुळे एनएनपीएच्या १४३ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या औषधांची किंमत कमी करण्यात आली
१)यकृतातील ग्लुकोजचे उत्पादन कमी करून रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Dapagliflozin Metformin Hydrochloride या औषधाची किंमत एका टॅब्लेटसाठी १६ रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर पूर्वी त्याची किंमत ३० रुपये होती.

२) बुडेसोनाइड आणि फॉर्मोटेरॉल सारख्या औषधांचे संयोजन दम्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारण्यासाठी वापरले जाते. त्याची किंमत आता एका डोससाठी ६.६२ रुपये करण्यात आली आहे. साधारणपणे १२० डोसच्या बाटलीची किंमत ३,८०० रुपये असते.

३) हायड्रोक्लोरोथियाझाइड गोळ्या या रक्तदाबावरचे औषध आहे. त्याची किंमत आता ११.०७ रुपयांऐवजी १०.४५ रुपयांना मिळणार आहे. लाइव्हमिंटच्या म्हणण्यानुसार, संक्रमणासाठी Ceftazidime आणि Avibactam (सोडियम सॉल्टच्या स्वरूपात) पावडरची किंमत आता ४०० रुपयांऐवजी १, ५६९. ९४ रुपये प्रति पॅकेट ठरवण्यात आली आहे. अँटासिड अँटीगॅस जेलही आता स्वस्त झाले असून त्याची किंमत २. ५७ रुपयांवरून ०.५६ रुपये प्रति एक मिली इतकी कमी झाली आहे.

४) Atorvastatin, Clopidogrel आणि ऍस्प्रीन कॅप्सूलची किंमत सध्याच्या ३० रुपयांच्या तुलनेत आता प्रति कॅप्सूल १३.८४ रुपये ठरवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोविडोन-आयोडीन आणि ऑर्निडाझोल मलमाची किंमत चार रुपये प्रति ग्रॅम ठरवण्यात आली आहे. यापूर्वी १५ मिलीग्रॅमची किंमत ७० रुपये होती. आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल गोळ्यांची किंमत सहा रुपयांच्या तुलनेत १.५९ रुपये प्रति टॅबलेट ठरवण्यात आली आहे.

भारतात मधुमेह रुग्णांची संख्या
जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्णाची संख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असून १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण असल्या कारणाने औषधांच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यातच औषधनिर्माण विभागाने ९२३ नियोजित औषधांच्या फॉर्म्युलेशनसाठी वार्षिक सुधारित किमती आणि ६५ फॉर्म्युलेशनच्या सुधारित किरकोळ किमती एक एप्रिलपासून लागू केल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button