breaking-newsपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: ऋषिकेश हजारे युवा मंचतर्फे भोसरी-इंद्रायणीनगरमध्ये जीवनाश्यक वस्तुंचे वाटप, २५० कुटुंबियांना लाभ!

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

भोसरी व इंद्रयानीनगर परिसरात पै. ऋषिकेश रोहिदास हजारे युवामंच व शशिकला हजारे फौंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. महापालिका अथवा कोणतीही शासकीय मदत न घेता हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे.

परिसरातील गरजू नागरिकांना किमान एक महिना पुरेल इतका अन्नधान्यसाठा असलेली कीट देण्यात येत आहे. यामध्ये  डाळ, तांदूळ, गहू, मसाले आदींचा समावेश आहे. आतापर्यंत परिसरातील सुमारे २५० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती ऋषिकेश हजारे यांनी दिली.

या उपक्रमासाठी अजिंक्य हजारे, प्रतीक गोगावले, अमन इनामदार, आकाश पाटील, राकेश होसाळे, आशिष बढे, अथर्व महाजन आदींनी सहकार्य केले.

दरम्यान, भोसरी-इंद्रायणीनगर परिसरातील गरजु नागरिकांनी 8888910355 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button