breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ ठरली

मुंबई : शिवसेनेच्या आमदार आपत्र प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ निश्चित करण्यात आली आहे. येत्या १४ सप्टेंबर रोजी या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी होणार आहे. दुपारी १२ वाजता सुनावणीला सुरूवात होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे साधारण ३४ याचिका आल्या आहेत. यावेळी प्रत्येक आमदारांचं म्हणण ऐकून घेण्यात येणार आहे तर त्यांच्याकडे असणारे सर्व पुरावे त्यांना यावेळी सादर करता येणार आहे. १४ सप्टेंबर रोजी या सर्व आमदारांची सुनावणी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही मॅरेथॉन सुनवाणी दिवसभर सुरू राहणार आहे.

हेही वाचा – मनोज जरांगे पाटील यांचा वैद्यकीय तपासणीला नकार, १४ दिवसांपासून उपाशी

शिंदे गटाने तब्बल ६ हजार पानांचं उत्तर सादर करण्यात आलं आहे. विधिमंडळात या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आता या प्रकरणाच्या सुनावणीला १४ सप्टेंबर रोजी सुरूवात होणार आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार? याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button