breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona : पिंपरी-चिंचवडमधील ४५० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी करोना बाधित पहिले तीन रुग्ण आढळले. त्यानंतर महापालिकेच्या वतीने शहरात सर्वेक्षण सुरु करण्यात आले. ज्या भागामध्ये करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच परदेशातून आलेले व त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्‍टमधील नागरिकांना होम “क्‍वॉरंटाईन’ करण्यात आले.

संपूर्ण शहरात सर्वेक्षण करत महापालिकेने 2 हजार नागरिकांना होम “क्‍वॉरंटाईन’ केले होते. त्यापैकी 450 व्यक्तींचा होम क्वांराटईन कालावधी संपला आहे. त्यांची करोना विषाणूची चाचणी केली असता, त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

राज्यामध्ये प्रथम पुणे शहरामध्ये 9 मार्च रोजी करोना बाधित दोन रुग्ण सापडले. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात 10 मार्च रोजी 1 व 12 मार्च रोजी तीन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. तसेच 12 मार्च नंतर शहरात आठ दिवस सातत्याने रुग्ण सापडत त्यांची संख्या 12 वर गेली होती. ही संख्या त्यावेळी राज्यामध्ये सर्वाधिक होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष पिंपरी चिंचवड शहराकडे लागले होते. महापालिका प्रशासनाने यावर खबरदारी घेत पूर्ण शहराध्ये सर्वेक्षण सुरु केले.

परदेशातून आलेले नागरिक, पॉझिटिव्ह सापडलेले रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना “क्‍वॉरंटाईन’ करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत दोन हजार नागरिकांना होम “क्‍वॉरंटाईन’ केले आहे. त्यातील 28 दिवसांचा कालावधी संपलेल्या नागरिकांना मोकळे केले जाणार आहे.

यापूर्वी 14 दिवसांचा कालावधी होती, मात्र त्यानंतरही त्यांच्यामध्ये काही लक्षणे दिसल्याने हा कालावधी 28 दिवसांचा केला होता. त्यातील 450 जणांचा 28 दिवसांचा “क्‍वॉरंटाईन’ कालावधी संपला आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. लक्षणे असली तरी त्यांची तपासणी केली असता तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button