breaking-newsताज्या घडामोडी

मतदान कार्डवरील फोटो बदलायचा आहे? तर ‘या’ स्टेप्स फॉलो करा..

Voter ID : भारतवासीयांसाठी वोटर आयडी हे कागदपत्र खूप महत्त्वाचे आहे. वोटर आयडी असल्यास नागरीकांना मतदानाचा अधिकार असतो. मात्र वोटर आयडीवरील फोटो जुना झाला असल्यास तो बदलायचा असल्यास खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

‘या’ स्टेप्स फॉलो करा!

  • सर्वप्रथम तुम्हाला राज्य मतदार सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर वेबसाइटवरील मतदार यादीतील नोंदी सुधारणे हा पर्याय निवडा.
  • त्यानंतर फॉर्म 8 निवडा. यात तुम्हाला राज्य, विधानसभा आणि तुम्ही ज्या मतदारसंघात आहात त्या ठिकाणाचे नाव निवडण्यास सांगितले जाईल.

हेही वाचा  –  इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला ‘बुस्टर डोस’

  • पुढे तुम्ही फॉर्ममधील सर्व माहिती भरा. तुमचे नाव, भाग क्रमांक, सिरियल नंबर आणि फोटो आयडी क्रमांक भरा.
  • यानंतर फोटोग्राफ पर्यायावर क्लिक करा.
  • यात तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, ओळखपत्र आणि वोटर आयडी क्रमांक भरण्यास सांगितले जाईल.
  • त्यानंतर तुमची जन्मतारीख, लिंग, आई किंवा नवऱ्याचे नाव टाका. त्यानंतर तुमचा नवीन पासपोर्ट साइज फोटो अपलोड करा.
  • फोटो अपलोड झाल्यानंतर ईमेल आयडी, फोन नंबर आणि ठिकाणाचे नाव भरा. यानंतर हा अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोन नंबर आणि ईमेल आयडीवर यासंबंधित मेसेज मिळेल.
  • त्यानंतर पुढच्या महिन्याभरात तुम्हाला वोटर आयडी किंवा मतदार यादीत सुधारणा झाल्याचे दिसेल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button