breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघडोहची चाल ऐटबाज, मुद्रा करारी!, ताडोब्यात चाहत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

चंद्रपूर : चाल ऐटबाज, मुद्रा करारी, रुबाबदारणा मोहून टाकणारा आणि भारदस्त देहयष्टी. असा होता, ‘वाघडोह’. त्याचा मृत्यू अनेकांचा चटका लावून गेला. तो दिसणे हे पर्यटकांसाठी अतिशय आनंददायी असायचे. मायाळूपणामुळे हे त्याचे वैशिष्ट्य होते. एरवी वाघांची चाळीस टक्के मृत्युमुखी पडतात. वाघडोहपासून झालेली सुमारे ८० टक्के पिल्ले जगली. या पिल्लांनी ताडोब्याचे वैभव वाढविले. वनविभागात त्याची ‘टी-३३’ अशी नोंद होती.

वाघडोहचा मोहर्ली, खातोडा व तैलिया तलावानजीक भू-भागांवर एकछत्री अंमल होता. येथे त्याने येडाअण्णा वाघाला हुसकावून लावले होते. रानगव्याची शिकार करताना त्याच्या डोळ्याला जखम झाली होती. त्याच्या चेहऱ्यावरील जखमेची खूण शेवटपर्यंत कायमच होती. तो ‘बिग डॅडी ऑफ ताडोबा’म्हणूनही ओळखला जात असे. सुमारे पंचेचाळीसहून अधिक पिल्लांचा तो वडील होता. त्याची पिल्लांसोबत खेळतानाची छायाचित्रे टिपणे एक वेगळाच आनंद असायचा, असे छायाचित्रकार निखिल तांबेकर म्हणाले.

भारदस्त शरीर ही त्याची ओळख होती. प्रतिस्पर्ध्यांमध्ये त्याची दहशतही यामुळेच प्रस्थापित झाली होती. तो फारसा झुंजत नसे. ताडोबा कोअरमधून मोहर्ली, आगरझरी, देवाडा मामला, जुनोना असा प्रवास त्याने केला. वाघ म्हातारा होता जातो तसतसा तो गाव-जंगलाच्या सीमेवर येतो. तो सिनाळा भागात स्थिरावला होता. मागील काही दिवसांपासून वृद्ध झाल्याने त्याची शक्ती क्षीण होऊ लागली. शिकार करणेही त्याला कठीण होऊ लागले होऊ लागले. यातच त्याचा त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच वन्यप्रेमींनी वाघडोहला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अनेकांनी आठवणी जाग्या केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button