breaking-newsEnglishTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादी-मनसे ट्विटर ब्रिजभूषण वादाचे पिंपरी-चिंचवड ‘कनेक्शन’ ;माजी नगरसेवक मयूर कलाटे नव्याचे चर्चेत

पिंपरी : रोहित आठवले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा रद्द झालेला आयोध्या दौरा, भाजप खासदार पैलवान ब्रिजभूषण आणि शरद पवार यांचा मनसे नेत्यांनी आज ट्विट केलेला फोटो हा पिंपरी चिंचवड ची संबंधित आहे.

मावळात तीन वर्षांपूर्वी झालेल्या एका कुस्ती कार्यक्रमाला कुस्तीगीर संघटनेचे प्रमुख म्हणून भाजप खासदार ब्रिजभूषण तर महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून शरद पवार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चिंचवड विधानसभा मतदार संघातील राजकीय आखाड्यात कायम चर्चेत असलेले माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी मावळ तालुक्यात वरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लोकसभा निवडणुकांपूर्वी हा कुस्ती आखाडा भरविण्यात आला होता. त्यानंतर कलाटे यांचे नाव मावळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले होते.

दरम्यान, प्रार्थनास्थळांवरील भोंगा आयोध्या दौरा या कारणांनी मनसेप्रमुख राज ठाकरे सध्या देशाच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू झाले आहेत. राज ठाकरे यांना विरोध म्हणून भाजपचे खासदार ब्रिजभूषण समोर आल्याने राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा कोणत्याही राजकीय पक्षाला मदत करण्यासाठी नव्हता असे काहीजण आता बोलू लागले आहेत परंतु राज ठाकरे यांनी खासदार ब्रिजभूषण त्यांनी केलेला विरोध आणि त्यापूर्वीचा नियोजित दौरा हा सर्व एक ट्रॅप असल्याचा उल्लेख पुण्यातील सभेत केला. त्याचबरोबर खासदार ब्रिज भूषण यांना महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांनी अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोपही या सभेत करण्यात आला.

खासदार ब्रिजभूषण आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सलोख्याचे संबंध असल्याने दौऱ्याच्या या सर्व विरोधाला कोण कारणीभूत आहे असा सवाल करीत मनसेकडून आज मावळ तालुक्यात झालेल्या कार्यक्रमाचे फोटो ट्विट करण्यात आले. कुस्ती-बैलगाडा आणि पिंपरी चिंचवड मावळ हे नाते तसे जुने आहे आहे कुस्तीच्या आखाड्यात राजकीय आखाडा बनवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून होत राहिला आहे. मयूर कलाटे यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी थेट संबंध आहेत. राज्यातील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्यामुळे कलाटेंचा स्थानिक राजकारणात वरचष्मा राहिला आहे.

****

राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “बालिशपणा म्हणायचं की पोरकटपणा म्हणायचं मला कळत नाही. आम्ही कुठेच राज ठाकरेंबद्दल वक्तव्य केलं नाही. सर्व सभांमध्ये त्यांनी शरद पवारांविरोधात वक्तव्य केलं. त्यांच्याकडून महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण तिन्ही भाषणं पाहिली तर आपल्याबद्दल, पक्षाबद्दल, भूमिकेबद्दल न बोलता राष्ट्रवादीने, शरद पवारांनी काय केलं याबद्दल बोलत होते”. असेही तपासे यांनी म्हटले आहे.

****

ब्रिजभूषण काय म्हणतात…
यावरून राजकारण पेटलेलं असताना बृजभूषण यांनी “होय, माझे शरद पवारांशी संबंध आहेत”, असं म्हटलं आहे. “शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्र कुस्ती संघासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते. तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी येत होत्या, त्या मला घातल्या याचा मला गर्व आहे. माझे संबंध आहेत त्यांच्याशी”, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button