वीरेंद्र सेहवागची भारतीय संघाच्या फलंदाजीवर नाराजी; म्हणाला..

Virender Sehwag : विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. यावरून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावरून भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय संघाच्या फलंदाजीवर नाराजी व्यक्त केली आहे.
वीरेंद्र सेहवाग म्हणाला, विराट आणि राहुलने अत्यंत संथपणे फलंदाजी केली. त्यांनी धावा करण्यासाठी एकदाही धोका पत्करला नाही. त्यामुळे भारताला २४०च धावा करता आल्या. विराट आणि राहुलने थोडी आक्रमक खेळी केली असती तर भारत सुस्थितीत असता.
हेही वाचा – ‘महाराष्ट्र पेटलाय आणि हे महाशय कॅसिनोत..’; संजय राऊतांचा बावनकुळेंवर गंभीर आरोप
भारताच्या दोन विकेट पडल्यानंतर, कोहली आणि राहुलला वाटले की, खेळपट्टी संथ आहे. त्यामुळे २५० धावांचं लक्ष्य मनात ठरवून ते संथ खेळू लागले. त्यांनी एकही धोका पत्करला नाही. जेव्हा दुसरा पॉवरप्ले चालू होता ज्यामध्ये पाच खेळाडू वर्तुळात होते. तेव्हा भारताला प्रत्येक षटकांत कोणताही चौकार किंवा षटकार न मारता किमान ४-५ धावा करता आल्या असत्या. दोघांपैकी एकाने आक्रमक खेळी करायला हवी होती. राहुलने १०७ चेंडू खेळून केवळ ६६ धावा केल्या. तो शेवटपर्यंत टिकून खेळला असता तर कदाचित त्याने धावा आणि चेंडूंमधलं अंतर कमी केलं असतं. पण स्टार्कने एवढा अप्रतिम चेंडू टाकला की तो (राहुल) काहीही करू शकला नाही, असंही वीरेंद्र सेहवाग म्हणाला.