‘महाराष्ट्र पेटलाय आणि हे महाशय कॅसिनोत..’; संजय राऊतांचा बावनकुळेंवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत चंद्रशेखर बावनकुळे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे. यामध्ये लिहिलं की, महाराष्ट्र पेटलेला आहे.. आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा.. ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है..
हेही वाचा – आरक्षण होते तर कुणी मराठा समाजाचे वाटोळे केले? मनोज जरांगेंचा सवाल
ते म्हणे..
फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या.
त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का?
ते म्हणे..
कधीच जुगार खेळले नाहीत..
मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का?
जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल!
झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!@BJP4Maharashtra… pic.twitter.com/aIjd3eJTO0— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
१९ नोव्हेंबर.. मध्यरात्री.. मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन.. साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत.. खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
ते म्हणे.. कुटुंबासह मकाऊ ला गेले आहेत… जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय! असंही संजय राऊत म्हणाले.