breaking-newsTOP NewsUncategorizedमनोरंजनमुंबई

#VIRALPOST – शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही…!- इमरान हाश्मी; वाचा काय झालं

सनी लिओनी आई तर इमरान हाश्मी वडील…

सध्या सोशल मीडियावर एक अनोखी पोस्ट व्हायरल होत आहे. सनी लिओनी आई तर इमरान हाशमी वडील म्हणून एका विद्यार्थ्याने आपल्या कॉलेज अर्जात नाव दिलं आहे. बसला ना तुम्हालाही धक्का. पण या दोघांच लग्नच नाही तर मुलगा कुठून आला? हे खरंच घडलंय. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये इमरान व सनीचा मुलगा अचानक प्रकटला.

काय आहे प्रकरण

मुज्जफरापूरमधील एका कॉलेजात इमरान व सनीचा 20 वर्षांचा मुलगा शिकत आहे. येथील भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठाअंतर्गत येणा-या मीनापूरस्थित धनराज महतो कॉलेजात बीएच्या दुस-या वर्षात शिकणा-या एका विद्यार्थ्याने आपल्या अर्जात आई-वडिल म्हणून इमरान व सनीचे नाव लिहिले आहे. अधिका-यांनी या विद्यार्थ्याचे ओळखपत्राचे फोटो पाहिले तेव्हा तेही अवाक् झाले.  कुंदरच्या ओळखपत्रावर वडीलांचे नाव इमरान हाशमी असल्याचे नमूद आहे. तर आईच्या नावाच्या जागी सनी लिओनी असे लिहिले आहे. घराचा पत्ता म्हणून चुतूर्भूज स्थान परिसराचे नाव. (चुतूर्भूज हा परिसर रेड लाइट एरिया म्हणून कुप्रसिद्ध आहे). 

तूर्तास तरी हा सगळा प्रकार म्हणजे, एखाद्याचा खोडसाळपणा असावा किंवा बेजबाबदारपणामुळे घडलेला प्रकार असावा, असे मानले जात आहे. आता या प्रकरणाचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

‘हा माझा नाही…’
इमरान व सनीच्या या अचानक उगवलेल्या मुलाची सध्या जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर त्याच्या ओळखपत्राचे फोटो व्हायरल होत आहेत. इमरान हाश्मीपर्यंत हा सगळा प्रकार पोहोचला तेव्हा त्याने यावर मोठी मजेदार प्रतिक्रिया दिली. ‘शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही’ असे ट्विट त्याने केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button