breaking-newsTOP NewsUncategorizedमनोरंजन

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही वेळापूर्वीच रेमोने त्याच्या ‘दिल ना तोडुंगा’ या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांना त्रास जाणवू लागला.

रेमो डिसूजावर अँजियोग्राफी झाल्याचे देखील समजते. अद्याप रेमोच्या कुटुंबीयांकडून रेमोच्या प्रकृतीबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही. कोरियोग्राफर म्हणून करिअरला सुरुवात करणाऱ्या रेमोने दिग्दर्शक म्हणून देखील स्वत:ला बॉलिवूडमध्ये सिद्ध केले आहे.  आतापर्यंत ‘फालतू’  ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन रेमोने केलं आहे. डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button