breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंधन दरवाढ : राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे-पाटील म्हणतात… भाजपा सरकारने देशावासीयांना संकटाच्या खाईत लोटले!

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीतर्फे महागाईच्या विरोधात निषेध आंदोलन
खंतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याची टीका

पिंपरी । प्रतिनिधी

कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या देशवासियांना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून आणखी संकटाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. इंधन, गॅस दरवाढीसोबत खतांची दरवाढ शेतक-यांचेही कंबरडे मोडले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महागाईच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी वाघेरे-पाटील बोलत होते.

यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, अजित गव्हाणे, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, प्रदेश ओबीसी प्रभारी सचिव सचिन औटे, पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील, युवक  संदीप उर्फ लाला चिंचवडे, महिला संघटिका कविताताई खराडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष यतीन पारेख, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष पल्लवी पांढरे, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, सरचिटणीस अमोल भोईटे, उपाध्यक्ष अकबर मुल्ला, संतोष वाघेरे,शशिकांत निकाळजे, अभिजित आल्हाट, रशीद सय्यद, निखिल दळवी, बाळासाहेब पिल्लेवार, ज्योती निंबाळकर, सुनील अडागळे, पोपाट पडवळ आदी उपस्थित होते.

भाजपामुळेच शेतकरी अडचणीत…

शहराध्यक्ष वाघेरे-पाटील म्हणाले की, भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. गॅसचे दर सातत्याने वाढविले जात आहे. कोरोना संकटाचा परिणाम उद्योग, धंदे, व्यावसायावर झालेला आहे. या परस्थितीत केंद्रातील सरकारने नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु, केंद्रातील सरकार इंधन, गॅस दरवाढ करून जनतेला आणखी संकटात टाकण्याचे काम करत आहे. पेट्रोलचे दर  शंभर रुपयांच्यावर गेलेले आहेत. संकटाच्या घडीला खतांच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. परिणामी, शेतकरीही अडचणीत आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button