breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘..तर शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान बनवावे’; काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

मुंबई : पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसमुळे शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार यांची एवढी काळजी आहे, तर त्यांनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे.

मोदींनी मणिपूर, बेरोजगारी, शेतकरी, गरीबी, महागाईबद्दल बोललं पाहिजे. गेली नऊ वर्षे झाले देशातील जनता राजकीय भाषण ऐकत आहे. जनता ‘मन की बात’ ऐकण्यासही तयार नाहीत. मणिपूर पेटत असताना पंतप्रधान मौन ठेवत असतील, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – ICC ODI World Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासह ९ सामन्यांचे वेळापत्रक बदलले

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button