breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

दिग्गज फुटबॉलपटू मैदानावर कोसळला आणि क्रिडाप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला

कोपनहेगन – युरो कप-2020मध्ये काल, शनिवारी झालेल्या डेन्मार्क-फिनलंड सामन्यादरम्यान एका क्षणी जगभरातील चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या काळजाचा ठोका चुकला होता. डेन्मार्कचा सर्वोत्तम आक्रमकपटू ख्रिस्तियन एरिक्सन सामन्यादरम्यान मैदानावर कोसळल्यामुळे सामन्यात भीती आणि थराराचे वातावरण निर्माण झाले आणि सामना स्थगित करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंनी त्वरित ख्रिस्तियनच्या दिशेने धाव घेतली आणि एरिक्सनच्या पत्नीनेदेखील मैदान गाठले. त्याला श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचे समजते. यावेळी अनेकांना रडू कोसळले. मात्र काही मिनिटांच्या अवधीतच एरिक्सनची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ट्वीट युरोपियन फुटबॉल महासंघाने केले. त्यानंतर दोन्ही संघ आणि सामनाधिकाऱ्यांची आपत्कालिन बैठक बोलावण्यात आली. त्यात सामना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जगभरातील क्रीडा चाहत्यांकडून डेन्मार्क संघाचे कौतुक करण्यात आले.

दरम्यान, 11 जूनपासून फुलबॉल जगतातील मिनी वर्ल्डकप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘युरो कप – 2020’ या स्पर्धेला सुरुवात झाली. शनिवारी कोपनहेगन पार्केन स्टेडियममध्ये फिनलँड विरुद्ध डेन्मार्क हा सामना सुरू होता. उभय संघांतील लढतीची ४० मिनिटे झाली असतानाच एरिक्सनने सहकाऱ्याला चेंडू सोपवला आणि क्षणार्धातच तो थेट खाली कोसळला. एरिक्सन बेशुद्ध पडल्यानंतर सामना त्वरित स्थगित करण्यात आला. काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला. आपला लाडका खेळाडू मैदानात अचानक बेशुद्ध होऊन कोसळल्यामुळे चाहते हैराण होते. तसेच संपूर्ण मैदानात शांतता पसरली होती. काही चाहत्यांना रडूही अनावर झालं. एवढचं नाही, तर डेन्मार्कच्या संघातील सर्व खेळाडूही रडू लागले. अशातच सध्या सोशल मीडियावर एरिक्सनच्या उत्तम प्रकृतीसाठी सर्व चाहते प्रार्थना करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोना संकटात पार पडणाऱ्या या सामन्यासाठी पहिल्यांदाच 15000 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button