breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये आजही दिवसाला जवळपास हजार ते दीड हजार नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर दररोज किमान तीस जणांचा मृत्यू होतो. या चिंताजनक परिस्थितीची दखल आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली आहे. जिल्ह्यात प्रशासनाकडून राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आणि राजेश टोपे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते प्रशासकीय प्रमुखांसह लोकप्रतिनिधींनीसोबत बैठक घेणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याचीदेखील काहीशी अशीच परिस्थिती होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती. या नंतर मात्र साताऱ्यातील रुग्णसंख्या काहीशी कमी होताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरात होत असलेली उपमुख्यमंत्र्यांची बैठक किती परिणामकारक असेल हे काही दिवसांतच कळेल.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button