breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ताम्हाणे वस्तीत वृक्षारोपण

  • शाखाप्रमुख प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ताम्हाणे वस्ती शाखेचा उपक्रम

पिंपरी / महाईन्यूज

शिवसेनेच्या ताम्हाणे वस्ती शाखेचे शाखाप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील यांच्या वतीने शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “जन्मदिनी वृक्ष लावू प्रत्त्येकानी” या वृक्षारोपणाच्या संकल्पाने त्यांना पर्यावरणपूरक शुभेच्छाही देण्यात आल्या.

शिवसेना विभागप्रमुख नितीन बोंडे यांच्या हस्ते परिसरात वड, पिंपळ, जांभुळ, करंज अश्या प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ताम्हाणेवस्ती भागात दोनशे रोपांचे वाटपही करण्यात आले होते. यावेळी युवासेनेचे सुनिल समीर, अमित शिंदे, अक्षय चौधरी, अक्षय साळुंखे, विकास काटे, संजीत यादव, नितीन लोकरे, अभिषेक काळे, कार्तिक टोणपे, प्रणव पाटील आदि उपस्थित होते.

विभागप्रमुख नितीन बोंडे म्हणाले, कोरोना काळात माणसाला झाडांचे महत्व व ऑक्सिजनची गरज लक्षात आली. पर्यावरणाकडून मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनअभावी कित्येकांना हे जगच सोडून जावे लागले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरणासाठी केलेले काम अभिमानास्पद आहे. त्यांच्या वाढदिनी विविध वृक्षांची लागवड करून सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न गौरवास्पद आहे.

शाखाप्रमुख प्रवीण पाटील म्हणाले, दरवर्षी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी पार पडतो. परंतु, यंदा कोरोनाच्या धर्तीवर वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपणाद्वारे हा वाढदिवस साजरा करून त्यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देत आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button