breaking-newsराष्ट्रिय

इशा अंबानीच्या संगीत पार्टीत ऐश्वर्या आणि करिश्माचा एकत्र डान्स, भूतकाळ विसरुन आल्या एकत्र

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाआधी उदयपूरमध्ये दोन दिवस प्री-वेडिंग सेलिब्रेशन करण्यात आलं. या कार्यक्रमात बॉलिवूडचे सेलिब्रिटीदेखील उपस्थित होते. फक्त बॉलिवूडच नाही तर खेळ आणि उद्योग क्षेत्रातीलही मोठी नावं कार्यक्रमात सहभागी होती. या संगीत सोहळ्यात करण जोहर, शाहरुख खान, गौरी खान, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनसहीत अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्म केलं.

कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. संगीत सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशीही पार्टी ठेवण्यात आली होती. यावेळी बॉलिवूडच्या गाण्यांवर सर्व सेलिब्रिटी थिरकताना दिसत होते. यामध्ये नुकतंच विवाहबंधनात अडकलेले रणवीर आणि दीपिका पदुकोणदेखील होते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनीदेखील डान्स फ्लोअरवर धमाल केली. त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते ऐश्वर्या आणि करिश्मा कपूरने. दोघींना एकत्र डान्स करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

ऐश्वर्याशी लग्न होण्याआधी अभिषेक बच्चनचं करिश्मा कपूरशी अफेअर होतं. 2002 मध्ये अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडाही ठरला होता, मात्र काही महिन्यातच तो मोडला. 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न झालं आणि तेव्हापासून करिश्मा आणि ऐश्वर्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

अनेक कार्यक्रमांमध्येही ऐश्वर्या आणि करिश्मा एकमेकांना दुर्लक्षित करत असताना दिसलं होतं. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघींमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button