breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

राज ठाकरेंच्या भाषणावेळी वसंत मोरे रांगते उभे; नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त तीन दिवसीय “अशोक पर्व” या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांचे भाषणही झाले. यावेळी पहिल्या रांगेत मनसेचे सर्व पदाधिकारी बसले होते. मात्र पोउन्यचे मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे हे मात्र राज ठाकरे यांचे भाषण मागे रांगेत उभी राहुन एकत होते. त्यामुळे पुण्यात मनसे मध्ये दुफळी असल्याचे प्रकर्षाने जाणवले. वसंत मोरे यांच्या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

यावेळी राज ठाकरे यांचं दणक्यात भाषण झालं. मात्र चर्चा वसंत मोरेंच्या एका फोटोची होत आहे. कोथरूडमधील यशवंत नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडत असताना राज ठाकरे यांच्या भाषणाला मनसे नेते किशोर शिंदे, हेमंत संभूस, अजय शिंदे, बाळा शेडगे, अनिल शिदोरे हे उपस्थित होते. विशेष म्हणजे हे सर्व नेते पहिल्या रांगेत बसलेले होते. दुसरीकडे मनसेचे पुण्याचे डॅशिंग नेते वसंत मोरे हे मात्र मंचाच्या डाव्या बाजूला पाठीमागे एका कोपऱ्यात उभे राहून भाषण ऐकताना दिसले. पहिल्या रांगेत जागा असताना देखील शहर मनसेच्या हा पहिल्या फळीतील नेता पहिल्या रांगेत न बसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे वसंत मोरे जिथे उभे होते, त्या पहिल्या रांगेत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसलेले होते. आपल्या बाजूला पक्षाचा सीनियर नेता उभा आहे, हे माहीत असूनही एकही पदाधिकारी उठून उभा राहिला नाही. कुणीही वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नाही. त्यामुळे मोरे यांना कार्यक्रम संपेपर्यंत उभंच राहावं लागलं. वसंत मोरे यांना आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बसायला जागा दिली नाही. यावरून पक्षात मोरे यांची अजूनही अवहेलना सुरू असल्याची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button