breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Coronavirus | मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई | मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये तब्बल 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जसलोक हॉस्पिटल 13 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. याआधी मुंबईतीलच वोकहार्ट रुग्णालयातील 26 नर्स आणि तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने हे रुग्णालय कन्टेंटन्मेंट झोन घोषित करुन सील करण्यात आलं आहे.

जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाकडून कर्मचाऱ्यांना ही लागण झाल्याचं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. सुरुवातीला एका नर्सला ही लागण झाली. त्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून हॉस्पिटलने त्यांच्या 1005 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली, ज्यात 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या सर्वांवर सध्या जसलोक, कस्तुरबा आणि सेव्हन हिल्समध्ये उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button