breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
उत्तराखंडच्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्या इंदिरा हृदयेश यांचे निधन
नवी दिल्ली – उत्तराखंडच्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्या इंदिरा हृदयेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी त्या काँग्रेसच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी राजधानीत आल्या होत्या. मात्र आता त्यांचा मृतदेह उत्तराखंड येथे नेण्याची तयारी सुरू आहे.
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी ट्विटद्वारे त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘या दुःखद बातमीने मन दु:खी झाले आहे. इंदिरा बहिणजी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक पदे सुशोभित केली आहेत आणि विधिमंडळातील कामात प्रवीणता मिळविली आहे. हे माझे वैयक्तिक नुकसान आहे.’