breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई – कोविड-१९ मुळे जमावबंदी असतानाही गोरेगाव येथे पेट्रोल दरवाढीविरोधी गोरेगाव येथे काँग्रेस आमदार तथा मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्ते यांनी आंदोलन करत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या विरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. शनिवार १२ जून रोजी गोरेगाव येथे पेट्रोल दरवाढीविरोधी गोरेगाव येथे काँग्रेस आमदार तथा मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत होते.
कोविड- १९ मुळे जमावबंदी असल्याने पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि भाई जगताप यांना आंदोलन थांबावयला सांगितले. पण आंदोलन न थांबवता काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर गेले एवढेच नाही तर भाई जगताप यांनी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याला बोट दाखवत त्यांच्या बाजूला असलेल्या एका वर्दीतील हवालदाराला भाई जगताप यांनी ढकलले, असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली.

काँग्रेस कार्यकर्ते यानंतर आधिक आक्रमक झाले आणि त्यांनी अजून जोर-जोरात आरडा-ओरडा करु लागले आणि पोलिसांच्या अंगावर जाऊ लागले. हे पाहून शेवटी भाई जगताप यांनीच काँग्रेस कार्यकर्त्यांना मागे लोटले. आश्चर्य म्हणजे आंदोलनातील अनेकांनी नियमांचे उल्लंघन करत आंदोलनात सहभागी झाले हाते. अनेकांनी मास्क घातला नव्हता आणि भाई जगताप यांनी देखील मास्क घातला नव्हता, अशीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी भाई जगताप व गोरव राणे यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यावर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button