breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

इस्त्रोकडून आदित्य एल १ बाबत अपडेट; आदित्य एल १ मिशननं कक्षा बदलली

Aditya L-1 : ‘आदित्य एल १’ मिशन बाबत भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनं अपडेट दिली आहे. ‘आदित्य एल १’ मिशननं अर्थ बाऊंड मॅन्यूवरची दुसरी कक्षा पार केली आहे. ‘आदित्य एल १’ मिशन आता तिसऱ्या कक्षेत फिरत आहे. सध्या भारताचं यानं पृथ्वीच्या चारी बाजूनं 296 कि.मी. x ७१७६७ कि.मी च्या अंडाकृती कक्षेत फिरत आहे. आदित्य एलवनचं नियंत्रण मॉरिशस, बंगळुरु येथील ISTRAC आणि श्रीहरीकोटा येथील एसडीएसी-एसएचएआर आणि पोर्ट ब्लेअर येथून केलं जात आहे.

हेही वाचा – ‘कुणाच्या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्ट करेल’; देवेंद्र फडणवीस 

‘आदित्य एल १’ पुढील कक्षा १५ सप्टेंबर रात्री २ वाजता बदलणार आहे. भारताचं सूर्ययान त्या दिवशी तिसऱ्या कक्षेतून चौथ्या कक्षेत प्रवेश करेल. याच दरम्यान ‘आदित्य एल 1’ मिशनवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यानं सेल्फी पाठवली होती. पृथ्वी आणि चंद्राचा फोटो देखील पाठवला आहे. ‘आदित्य एल १’ मिशन १८ सप्टेंबर पर्यंत पृथ्वीच्या चारी बाजूनं चार वेळा कक्षा बदलणार आहे. ज्यावेळी ‘आदित्य एल १’ लँग्रेज १ पॉइंटला पोहोचेल त्यावेळी १४४० फोटो पाठवणार आहे. सूर्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करण्यासाठी इतक्या संख्येनं फोटो पाठवले जाणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button