breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

केंद्र सरकारचा प्री-इंस्टॉल अ‍ॅपबाबत घेतला मोठा निर्णय!

चिनी अ‍ॅप्स आणि त्यांच्या सुरक्षा धोरणाबद्दल सरकारने केली चिंता व्यक्त

Pre Install Apps : स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे. आता स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल असणारे ॲप्स जे आपल्याला डिलीट/काढून टाकता येत नाही, त्यांचा वापर होत नसूनही ते आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवावे लागत असल्याने आपण त्रस्त होतो. स्मार्टफोन वापरकर्त्यांची आता लवकरच यातून सुटका होणार असल्याची माहीती आहे.

केंद्र सरकार आता प्री-इन्स्टॉल असलेल्या अ‍ॅप्सबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. स्मार्टफोनमधील Pre Installed Apps बंद करण्याचा सरकार विचार करत आहे. याचा परिणाम स्मार्टफोन बाजारात नवीन स्मार्टफोन जेव्हा लाँच होतील, तेव्हा होऊ शकतो. Samsung, Xiaomi, Vivo, Apple या सारख्या कंपन्यांवर याचा परिणाम होऊ शकतो अशी माहीती आहे.

नवीन सुरक्षा नियमांनुसार, प्री इंस्टॉल अ‍ॅप्स काढून टाकले जाऊन प्रमुख ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्सची अनिवार्य स्क्रीनिंग करण्याची परवानगी दिली जाईल. चिनी अ‍ॅप्स आणि त्यांच्या सुरक्षा धोरणाबद्दल सरकारने अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. प्री-इंस्टॉल केलेल्या अ‍ॅपवर सरकार लगाम घालणार आहे, अशी माहीती मिळत असली तरी सध्या या प्रकरणी केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहीती आलेली नाही.

भारताचे आयटी मंत्रालय हेरगिरी आणि यूझर्सच्या डेटाचा गैरवापर होण्याच्या अंदाजाने हा विचार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गूगलने भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आणि गुगल बिलिंगमध्ये अनेक बदलांची घोषणा केली आहे. सरकार प्रत्येक प्रमुख ऑपरेटिंग सिस्टम अपडेट यूझर्ससाठी रोलआउट करण्यापूर्वी स्क्रीनिंग अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button