breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मुख्यमंत्र्यांचं भाषण होईपर्यंत संदीपान भुमरे पाठीमागेच थांबले, कानातही बोलले, मात्र शिंदेंनी काहीच घोषणा केली नाही!

औरंगाबाद । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या पुढाकाराने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील कावसानकर स्टेडिअमवर सोमवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमाची गेली आठवडाभर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होती. आदित्य ठाकरे यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी करुन दाखवेल, असं चॅलेंजच संदीपान भुमरे यांनी दिल्याने सभेच्या गर्दीकडेही माध्यमांच्या कॅमेरांचे लक्ष होते. दरम्यान, भुमरेंनी पैसे देऊन गर्दी जमविल्याचा आरोपही झाला. मात्र ठाकरेंच्या चमच्याला मी योग्य उत्तर देईन, असं म्हणत भुमरेंनी संबंधित वृत्ताचं खंडन केलं.

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. ज्या पैठणकरांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचं रिकाम्या खुर्च्यांनी स्वागत केलं तिथेच मुख्यमंत्र्यांच्या जंगी सभेचं प्लॅनिंग आखून भुमरेंना ठाकरे गटाला आपली ‘शक्ती’ दाखवून द्यायची होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेला भुमरेंनी गर्दीही जमवली, पण ज्या अपेक्षेने भुमरेंनी मुख्यमंत्र्यांची सभा लावली, ती अपेक्षा मात्र काही पूर्ण होऊ शकली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण होईपर्यंत भुमरे त्यांच्यापाठीमागे उभे राहिले. मध्येमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कानातही ते काहीबाही सांगत होते, पण मुख्यमंत्र्यांनी फक्त ऐकून घेणेच पसंत केले. त्यांनी कुठलीही घोषणा केली नाही. अमुक तमुक योजनांना सरकार नक्की विचार करेल, असं सांगत एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुमरेंची बोळवण केल्याची चर्चा पैठणमध्ये ऐकायला मिळाली.

रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या पुढाकाराने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील कावसानकर स्टेडिअमवर सोमवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमाची गेली आठवडाभर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होती. आदित्य ठाकरे यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी करुन दाखवेल, असं चॅलेंजच संदीपान भुमरे यांनी दिल्याने सभेच्या गर्दीकडेही माध्यमांच्या कॅमेरांचे लक्ष होते. दरम्यान, भुमरेंनी पैसे देऊन गर्दी जमविल्याचा आरोपही झाला. मात्र ठाकरेंच्या चमच्याला मी योग्य उत्तर देईन, असं म्हणत भुमरेंनी संबंधित वृत्ताचं खंडन केलं. दुपारी साडे चार वाजता मुख्यमंत्र्यांचं पैठणमध्ये आगमन झालं. सभास्थळी मुख्यमंत्री साधारण पाच वाजता पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या पुढे पाठीमागेच भुमरे होते.

मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिले तसे भुमरेही त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले. मोठी फिल्डिंग लावून मुख्यमंत्री पैठणमध्ये आले आहेत म्हटल्यावर ते शहरासाठी मोठी घोषणा करतील, अशी आशा संदीपान भुमरे यांना होती. त्यासाठी ते मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरु असताना त्यांच्या कानालाही लागले. मात्र भुमरेंनी केलेल्या मागण्यांवर कोणतीही मोठी घोषणा न करता सरकार याचा निश्चित विचार करेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांची बोळवण केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने आता आपल्याला ‘आपला’ मुख्यमंत्री मिळाला आहे. दीड महिन्यात पैठणला त्यांनी २ हजार कोटींचा निधी दिलाय. या शिवाय मतदारसंघात अजून खूप कामे करायची आहे, असं सांगत भुमरेंनी आपल्या भाषणात कामाची आणि निधीची जंत्रीच मांडली. पण मुख्यमंत्र्यांनी भुमरेंचं भाषण शांतपणे ऐकलं. गरज वाटेल तिथे भुमरेंच्या भाषणाला मान डोलावून, स्मितहास्य करुन प्रतिसादही दिला. मात्र ज्यासाठी भुमरेंनी अट्टहास केला, तो उद्देश काही मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भुमरेंसाठी थोडी खुशी थोडा गम!
पैठणमध्ये १०० खाटांच्या शासकीय रुग्णालयाची मागणी भुमरेंनी केली होती. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली. लवकरच रुग्णालयाला मान्यता देऊ, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत सांगितलं. संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी निधी देऊ, पैठणीसाठी क्लस्टर उभारण्याची मागणी लक्षात घेऊन त्यासाठीही निधी देऊ, संत विद्यापीठासाठी २० कोटींच्या निधीची गरज असल्याचं मला सांगितलं आहे, त्यासाठी मी लवकरच बैठक घेतो, अशी आश्वासने देताना निधी कमी पडू देणार नाही, असं मुख्यमंत्री वारंवार आपल्या भाषणात सांगत राहिले मात्र कोणतीही ठोस घोषणा करण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button