ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरमधील सर्व सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील : कुंदाताई भिसे

– रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उदघाटन

पिंपरी, प्रतिनिधी :
झाडांचा पालापाचोळा, शेणखत आणि चहापत्ती यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताच्या दुसऱ्या प्लांटचे पिंपळे सौदागरमधील रोझ आयकॉन सोसायटीत आज (दि.१२)उदघाट्न झाले.उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी या प्लांटला भेट देऊन या प्लांटविषयी माहिती घेतली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, रवी मुंढे, पंकज देशमुख, गौरव पाटील, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, मोहित आगरवाल, शशिकांत शर्मा, विकास काटे, दिनेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कंपोस्ट प्रकल्प प्लांटमध्ये झाडांचा पाळापाचोळा, शेणखत, चहापत्ती या नैसर्गिक गोष्टींचेच मिश्रण करून खत तयार केले जाते. याला शासनाचा टेस्टिंग रिपोर्ट देखील मिळाला आहे. हे खत सोसायट्यांच्या किंवा घरांच्या छतावर आपण जी फळबाग किंवा भाजीपाला वैगेरे तयार करतो त्यामध्ये हे खत वापरले जाते. तसेच शेतासाठी देखील हे खत उपयुक्त ठरणार आहे.

याप्रसंगी बोलताना कुंदाताई भिसे म्हणाल्या की, ” कंपोस्ट प्रकल्प प्लांटमुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज आहे. घरातील आणि आपल्या आसपासच्या परिसरातील टाकाऊ कचरा देखील आपल्या किती फायद्याचा आहे हे या प्लांटमुळे दिसून येते.
दरम्यान भविष्यात अशाप्रकारचा प्लांट पिंपळे सौदागर परिसरातील सर्वच सोसायट्यांमध्ये व्हावा व हा उपक्रम राबविण्यासाठी जर काही मदत लागलीच तर उन्नती सोशल फाउंडेशन स्वतः पुढाकार घेईल व सहकार्य करेल असे आश्वासन फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी दिले .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button