breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपमध्ये प्रवेश

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यतक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये भाजपात प्रवेश केला.

प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रिया बेर्डे या मराठीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. गेली अनेक वर्षे प्रिया बेर्डे मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. प्रिया बेर्डे या दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आहेत. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांची मुलं स्वानंदी आणि अभिनय हे आहेत. ते दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button