breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरच्या त्रालमधील चकमकीत एक अतिरेकी ठार

श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील त्राल भागातील चेवा उलार येथे झालेल्या सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्यातील चकमकीत १ अतिरेकी ठार झाला आहे. या भागात सर्च ऑपरेशन सुरू असून काही ठिकाणी अद्याप चकमक सुरू असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

देशावर आणि जगावर कोरोनाचे संकट असताना जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडे अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा दलानेही या भागात कारवाई अधिक तीव्र केली आहे. त्यात मंगळवारी पुलवामातील बुंडजू भागात झालेल्या चकमकीत २ अतिरेकी ठार झाले होते, तर १ जवान शहीद झाला होता. सुरक्षा दलाने आतापर्यंत या भागात केलेल्या ३६ कारवायांमध्ये ९२ अतिरेकी मारले आहेत. १२६ पेक्षा जास्त जणांना अतिरेक्यांना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. २०१९ मध्ये १५० पेक्षा जास्त अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले होते. २०१८ मध्ये २५० हून अधिक अतिरेक्यांना ठार केले आहे. यंदा सुरक्षा दलाने आतापर्यंत मारलेल्या ९२ अतिरेक्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीनचे ३५ अतिरेकी आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button