breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

संसदेच्या कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलला, शर्टवर ‘कमळा’ची फुलं

Parliament Uniform : केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरला संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. नव्या संसदेतील विशेष अधिवेशनात कर्मचारी नवीन गणवेशात दिसणार आहेत. नवीन गणवेशात बंद गळ्याच्या सूटची जागा कमळाचे चित्र असलेला शर्ट व मणिपुरी टोपी घेणार आहे.

जांभळ्या, तपकिरी व गडद गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट व कमळाच्या फुलाचे चिन्ह असा शर्ट असेल, तर खाकी रंगाची पँट असेल. संसदेच्या दोन्ही पीठासीन अधिकाऱ्यांच्या बाजूला असलेले ‘मार्शल’ही आता सफारी सूटऐवजी क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा व मणिपुरी पगडी अशा गणवेशात दिसतील. महिला कर्मचारी नवीन नक्षीच्या साड्यांमध्ये दिसतील. सचिवालयात काम करणारे अधिकारी-कर्मचारीही बंद गळ्याच्या सूटऐवजी गुलाबी किंवा किरमिजी रंगाचे नेहरू जॅकेट घालतील.

हेही वाचा – ‘ओबीसींना राजकीय आरक्षण नको म्हणून भाजपचेच पदाधिकारी कोर्टात गेले’; रोहित पवार यांचा आरोप

विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, १८ सप्टेंबर रोजी सध्याच्या संसद भवनात बैठक होणार आहे. दुसऱ्या दिवशी, १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला पूजा केल्यानंतर नव्या संसदेत विधिवत प्रवेश होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button