ओम शिवशक्ती मित्र मंडळातील मतदारांचा आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश

पिंपरी : भारतीय जनता पार्टीचे विकासाभिमुख धोरण, निर्णायक नेतृत्व आणि कामातून विश्वास निर्माण करणारी कार्यसंस्कृती पाहता शहरातील तसेच राज्यातील तरुणांचा कल वेगाने भारतीय जनता पक्षाकडे वळत असून प्रभाग क्र. १० मधील ओम शिवशक्ती मित्र मंडळ येथील मतदारांनी आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
पोकळ घोषणा, अपयशी कारभार आणि केवळ टीकेच्या राजकारणाला कंटाळलेले सुशिक्षित तरुण आता ठोस काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी पदाधिकारी तसेच विविध सामाजिक व कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांनी भाजपवर विश्वास दाखवत पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र.२८ मध्ये भाजपचा झंझावात

हे सर्व प्रवेश कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नसून आमदार अमित गोरखे यांच्या प्रभावी नेतृत्वावर, पारदर्शक कार्यपद्धतीवर आणि प्रभागातील ठोस विकासकामांवर असलेल्या दृढ विश्वासातून झालेले आहेत. प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरिक सुविधा आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी झालेल्या कामांची दखल घेत ओम शिवशक्ती मित्र मंडळातील तरुणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
काल प्रभाग क्रमांक १० मधील ओम शिवशक्ती मित्र मंडळाच्या तरुणांनी कर्तव्यपथ जनसंपर्क कार्यालयात आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत विरोधकांना स्पष्ट राजकीय संदेश दिला. सुशिक्षित व जागरूक मतदारांनी विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देत आपल्या राजकीय भूमिकेची भक्कम नोंद या प्रवेशाद्वारे करून दिली.
आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असून विकासाच्या राजकारणाला जनतेचा निर्णायक कौल मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.




