ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियत वयोमानानुसार सात पोलीस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार व निरोप समारंभ मंगळवारी आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे पार पडला.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त सतीश नांदूरकर, दिक्षक साळुंके, पोलीस निरीक्षक शंकर डामसे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शांताराम उमे, रामदास नरवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उन्मेश जोशी आणि पोलीस हवालदार राजू केदारी यांचा कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला.

हेही वाचा –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून ५७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त…

त्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, रोप व भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त गणेश इंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button