ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला विजयी करा; डब्बू आसवानी

प्रभाग २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची प्रचारफेरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी | स्वच्छ व सुंदर पिंपरी घडवण्यासाठी प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवानी यांनी केले.

पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ पिंपरी कॅम्पातील सी-ब्लॉक, शनी मंदिर, वैष्णव देवी परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वेळी माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे, मीना नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे, कल्पना घाडगे, ज्योती साठे, अनिता मोईकर, सोनाली कुदळे, माधुरी कुदळे यांच्यासह राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, शेखर अहिरराव, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव, प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी, रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज, सुरेश परदेशी, अजय गुप्ता, नीरज चावला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा     :          कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा भाजपाला जाहीर पाठिंबा!

यावेळी बोलताना डब्बू आसवानी म्हणाले, उपमहापौर व नगरसेवक म्हणून कार्यरत असताना संदीप वाघेरे यांच्यासोबत प्रभागात काँक्रीटचे रस्ते, सबवे यांसारखी विकासकामे करण्यात आली. पिंपरी गाव व कुदळे कॉलनी परिसरात नवीन पाणी कनेक्शन देण्यात आले. मिलिंदनगर येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनी सुविधा अंतिम टप्प्यात असून, निवडणूक आचारसंहितेमुळे उद्घाटन रखडले आहे. येत्या पाच वर्षांत मतदारसंघातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करून प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संदीप वाघेरे यांनी २०१७ पासून नगरसेवक म्हणून केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. मिलिटरी डेअरी फार्म परिसरात ६ हजार वृक्षारोपण, डेरी फार्म उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावणे, पवना नदी सुधार प्रकल्पासाठी केलेले प्रयत्न, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम पूर्ण करणे, पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचे नूतनीकरण, पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागरदरम्यान नदीवरील पुलाचे रुंदीकरण तसेच कोरोना काळात जिजामाता रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांची मदत यांचा त्यांनी उल्लेख केला. स्वच्छता, विकास आणि लोकहिताची कामे पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला मतदारांनी भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button