Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
VIRAL:आधी ‘गो कोरोना’ नंतर ‘नो कोरोना, कोरोना नो’; रामदास आठवलेंची नवी घोषणा
![The farmers' march in Mumbai is a publicity stunt, criticized by Ramdas Athavale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/ramdas_athwale_2623692_835x547-m.jpg)
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता राजकीय तसेच सर्वसामान्य व्यक्तींनासुद्धा खूप भावतात. कोरोना महामारीवर त्यांनी केलेली ‘गो कोरोना, कोरोना गो’ ही घोषणा खूप गाजली. सोशल मीडियावर यावर खूप मीम्स आणि गाणी देखील तयार करण्यात आली.
आता रामदास आठवलेंनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर एक नवी घोषणा दिली आहे. आधी ‘गो कोरोना’ आता ‘नो कोरोना, कोरोना नो’ घोषणा त्यांनी दिली आहे.
देशात सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा या जीवघेण्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची सूचना वारंवार केली जात होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यावेळी आपल्या सहकाऱ्यांसह हातात मेणबत्ती घेऊन ‘गो कोरोना, कोरोना गो’ अशा घोषणा दिल्या. कोरोना देशातून हद्दपार व्हावा यासाठी आम्ही या घोषणा दिल्या असल्याचा युक्तिवाद त्यांनी त्यावेळेस केला होता.