भारत-इंग्लंडमधील पहिला टी-२० सामना किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या..

Ind vs Eng | भारत आणि इंग्लंडदरम्यान आजपासून टी-२० मालिका सुरु होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकात्यामधील इडन गार्डन्सच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. तर साडेसहा वाजता टॉस होणार आहे. या वर्षी टीम इंडियाची ही पहिलीच टी-२० मालिका आहे.
प्रेक्षकांना हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टारच्या अॅप्लिकेशन आणि वेबसाईटवरुनही सामना लाइव्ह पाहता येणार आहे. तसेच आजच्या सामन्यामध्ये भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तसेच जवळपास दोन महिन्यानंतर सूर्या मैदानात दिसणार आहे. त्यामुळे सूर्याच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा : शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा दावा
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग, अक्षर पटेल/ वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती/ रवी बिश्नोई.





