Uncategorized

प्रभाग क्र. २६ च्या विकासासाठी तुषार कामठे यांचा ठाम निर्धार!

मिशन- PCMC: जबाबदारीची ताकद म्हणजे विकासाची सुसाट वाट’चा संदेश

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक २६ मधील सुरक्षित, सशक्त आणि नियोजनबद्ध विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे अधिकृत उमेदवार तुषार गजानन कामठे यांनी मतदारांसमोर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती आणि वाकड या भागांचा समतोल विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, तर जबाबदारी स्वीकारून ती शेवटपर्यंत निभावण्याची हिंमत,” असे सांगत तुषार कामठे यांनी प्रभागातील प्रश्न हे कागदावरचे नसून नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेले असल्याचे स्पष्ट केले. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष कामातूनच उपाय केले जातील, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा –  १२ जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर, पण उर्वरित ZP अन् पंचायत समित्यांची निवडणूक कधी? मोठी माहिती समोर

आपल्या कार्यपद्धतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका, पारदर्शक निर्णय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा हाच आपला राजकीय आणि प्रशासकीय दृष्टिकोन असल्याचे सांगितले. “मी मोठी आश्वासने देत नाही, पण जे करेन ते जबाबदारीने आणि विश्वासाने करीन,” हा शब्द त्यांनी मतदारांना दिला. आरोग्यदायी, सुरक्षित आणि राहण्यायोग्य प्रभाग निर्माण करण्यासाठी संपूर्ण ताकदीने, वेळ देऊन आणि न थकता काम करण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

येत्या १५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोर बटण दाबून सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन तुषार कामठे यांनी प्रभाग क्रमांक २६ मधील सर्व मतदारांना केले आहे. प्रभागाच्या सुरक्षित आणि प्रगत भविष्यासाठीचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास व्यक्त करत “जबाबदारीची ताकद म्हणजे विकासाची सुसाट वाट” हा संदेश त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“मी मोठी आश्वासनं देत नाही, कारण विकास हा शब्दांनी नाही तर कामातून सिद्ध होतो. प्रभागातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर, प्रत्येक नागरिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सन्मानाने जगावा यासाठी जबाबदारीनं, पारदर्शकतेनं आणि सातत्याने काम करणं हीच माझी खरी ओळख आहे — आणि हीच माझी तुमच्याशी बांधिलकी आहे.”

— तुषार कामठे, उमेदवार, राष्ट्रवादी श.प. प्रभाग- 26.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button