Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शालेय शिक्षण विभागाकडील बांधकाम प्रकल्पांना गती’; शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विविध योजनांमधील बांधकाम प्रकल्पांना गती देत ते गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाकडील पुणे येथील शिक्षण आयुक्तालय इमारत, सातारा सैनिकी शाळा, समग्र शिक्षा अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना तसेच बालभारती अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.

या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य प्रकल्प संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सातारा सैनिकी शाळेच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पूर्ण, सुरू व प्रस्तावित विकासकामांसह क्रीडांगण, क्रीडा संकुल आदी सुविधांच्या प्रकल्पांचा घेताना मंत्री भुसे म्हणाले, सातारा सैनिकी शाळा ही महाराष्ट्राची मानबिंदू संस्था आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक पायाभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण काराव्यात. राज्यातील प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रभावना विकसित करण्यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित उपक्रम जिल्हानिहाय राबविण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सैनिकी शाळांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

हेही वाचा –  ‘दरडप्रवण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना उभारण्याच्या कामांना गती द्या’; मंत्री आदिती तटकरे

सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने शुल्क कमी करून ते टप्प्याटप्प्याने शून्यावर आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे संगत  मंत्री भुसे म्हणाले, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अभ्यासक्रमाचा समावेश करावा.

पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या प्रकल्पाचा आढावा घेऊन, सर्व विभाग एकाच छताखाली कार्यरत राहतील अशा एकात्मिक संकुलासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी  दिले.

समग्र शिक्षा अभियान, पीएम-श्री योजना तसेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाभियानांतर्गत सुरू असलेल्या वसतिगृह बांधकामे, शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली उभारणी आणि इतर विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सर्व कामे निश्चित वेळेत पूर्ण करताना गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या इमारत व पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेत मंत्री दादा भुसे यांनी सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गरजा आणि निश्चित निकषांच्या आधारे विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बालभारती अंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांचा आढावा घेऊन प्रलंबित कामांना गती देत आवश्यक प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्यात. विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांतील प्रकल्पांना अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबाबतही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सूचित केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button