Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेखलोकसंवाद - संपादकीयव्यक्तीविशेष : आर्टिकल

पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान बारामतीच्या पायाशी गहाण ठेवणार नाही : आमदार महेश लांडगे

मिशन- PCMC : भाजपाची मुलखमैदानी तोफ विसावली; प्रचाराची भोसरीत सांगता

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । गेल्या 9 वर्षांत आम्ही जे काम राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात झाले नाही. त्यावर काम केले आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याचा प्रयत्न केला. केवळ शिवनेरी जिल्ह्याची मागणी केली, म्हणून मला पवार कुटुंबीय ‘टार्गेट’ करीत आहेत. पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान बारामतीकरांच्या पायाशी गहाण ठेवणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी घेतली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आज संपली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, आज प्रचाराची सांगता झाली. शेवटच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले.

वस्तादांना स्वत:चा मुलगा मोठा करता आले नाही?

राजकीय आखाड्यात अजित पवार यांनी महेश लांडगे यांना मोठे केले, असा आरोप केला जात होता.  यावर बोलताना महेश लांडगे म्हणाले की, अजित पवार यांना 2019 पासून स्वत:च्या मुलाला मोठा करता आले नाही. राजकारणात प्रत्येकजण आपआपल्या परीने कष्ट करीत असतो, कोणी कोणाला मोठा करीत नाही. माझे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठींकडे मी कामे घेवून जातो. मी कधीही अजित पवारांकडे गेलो नाही, असेही आमदार लांडगे म्हणाले.

काय म्हणाले महेश लांडगे वाचा?

  1. मी पिंपरी-चिंचवडकरांच्या स्वाभिमानासाठी लढतोय. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडकर माझ्या पाठिशी आहेत.
  2. चुकीच्या पद्धतीने आणि पुराव्या अभावी जे आरोप करीत आहेत. त्यांच्यासाठी मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चांगला का होतो?
  3. आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदान मागितले. लोक त्याला प्रतिसाद देत आहेत.
  4. महाराष्ट्राच्या दादाला गल्लीतील दादाला रोखण्यासाठी गल्लीबोळात 200 लोकांच्या समोर सभा घ्यावी लागते. याचे त्यांनी आत्मचिंतन करावे.
  5. भ्रष्टाचाराचा एकही पुरावा देता आला नाही. ए्व्हढ्या मोठ्या नेत्याने राजकीय मर्यादा पाळल्या पाहिजेत. आम्ही 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, पुण्यातील दलित वतनाच्या जागेचा घोटाळा यावर बोललो. त्यावर त्यांना द्यायला उत्तर आहे का?
  6. राष्ट्रवादीला संपूर्ण 128 जागांवर उमेदवारसुद्धा देता आले नाहीत.
  7. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची बहुमताने सत्ता येईल आणि महापौर भाजपाचाच होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button