Uncategorized

मामुर्डी, किवळे, रावेत, गुरुद्वारा परिसरात शिवसेनेची प्रचारात आघाडी

प्रभाग १६ मधील शिवसेनेच्या पाठीमागे लाडक्या बहिणींनी ताकद उभी केली

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्र. १६ मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. मामुर्डी, किवळे, रावेत, गुरुद्वारा आणि वाल्हेकरवाडी परिसरात जुन्या व नव्या नेतृत्वांना संधी दिली आहे. त्यांनी प्रभागातील घरोघरी, सोसायटी टू सोसायटीमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत माहिती देत होते. त्यामुळे महिलाकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या वरती असलेला ठाम विश्वास दिसत आहे.

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ (अ गट), ऐश्वर्या तरस (ब गट), सौ. रेश्मा बापूजी कातळे (क गट) आणि निलेश तरस (ड गट) यांनी प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवले आहे.

किवळे परिसरातील महिला वर्गात रेश्मा बापूजी कातळे व बापूजी कातळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याच सोबत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली असल्याने महिलांचा शिवसेनेच्या उमेदवारांना घट्ट पाठिंबा असल्याचे दिसून येते. प्रभागाच्या विकासाला साथ देणारे असंख्य कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा –  बालवाडीतील मुलांचे मानसशास्त्र समजून घेणे गरजेचे – उमा तायडे

प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले. औक्षण करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण जिल्हा समोरील बटन दाबून पॅनेलला भरघोस मतदान करणार अशी सदिच्छा नागरिकांनी व्यक्त केली.

या वेळी मामुर्डी, किवळे, रावेत, गुरुद्वारा परिसरात खीच केताण धनुष्यबाण घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. एकूणच, प्रभाग क्र. १६ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, प्रभागातील तिरंगी लढतीत शिवसेनेचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button