Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालखी सोहळ्यात मंडप स्थलांतरावरून वाद, निगडीतील वारकऱ्यांच्या सेवाभावी मंडपांना स्थलांतराचा दबाव

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे चिटणीस सचिन काळभोर यांनी व्यक्त केला तीव्र संताप

पिंपरी चिंचवड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानासमोरील परिसरात सामाजिक संस्था, मंडळे, ट्रस्ट व सेवाभावी संघटनांच्या वतीने अन्नदान, वैद्यकीय मदत, फळ वाटप, रेनकोट व छत्री वितरण अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, परंपरागत ठिकाणी मंडप न उभारता दुसरीकडे स्थलांतर करण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे चिटणीस सचिन काळभोर यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, “महानगरपालिकेच्या परवानगीने उभारण्यात आलेले मंडप आता सुरक्षेच्या नावाखाली हलवण्याचा प्रकार अन्यायकारक असून, त्यामागे राजकीय दबाव असल्याची शक्यता आहे.”

हेही वाचा    :  अहमदाबादवरून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्द, प्रवासी संतापले 

प्राप्त माहितीनुसार, निगडी परिसरात भक्ती शक्ती उद्यानासमोर वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी उभारण्यात आलेले मंडप हे नियमानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत परवानगी व शुल्क भरून उभारण्यात आले आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव हे मंडप हटवून दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाकडून दबाव येत असल्याचे समोर आले आहे.

हजारो वारकरी बांधवांना भोजन, वैद्यकीय मदत, औषधे, रेनकोट, फळवाटप आदी सेवा देण्यासाठी नियोजित असलेल्या या मंडपांच्या जागेच्या बदलामुळे, अनेक सेवाभावी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेला धक्का बसत असल्याचे स्थानिक भूमिपुत्रांचे म्हणणे आहे.

आयुक्तांकडे मागणी – नियम शिथिल करावेत
या संपूर्ण प्रकरणात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी हस्तक्षेप करून मंडप परवाना व नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल करून सेवाभावी उपक्रम सुरळीत पार पडावेत, अशी मागणी भाजपा व अन्य स्थानिक संघटनांनी केली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या संस्थांना अडथळा न आणता प्रशासनाने सहकार्य करावे, ही मागणी आता जोर धरत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button