Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

Air India | अहमदाबादवरून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्द, प्रवासी संतापले

Air India | अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला जाणाऱ्या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले आहेत. १२ जून रोजी लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर अवघ्या सहा दिवसांनी एअर इंडियाचं अहमदाबाद लंडन हे विमान रद्द झालं आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान रद्द करण्यात आलं आहे अशी माहिती मिळते आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्लाइट AI-159 मध्ये उद्भवलेल्या तांत्रिक समस्येमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांना रि-शेड्यूलिंग किंवा पूर्ण परतावा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा    :      पालखी मार्गावर १ हजार ८०० मोबाईल टॉयलेटची व्यवस्था

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली असून, अहमदाबाद विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण होते. एअर इंडियाने याबाबत अधिकृत निवेदन जारी करून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button