खासदार गिरीश बापटांची प्रकृती प्रकृती खालावली ; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु
पुणेः पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
खासदार गिरीश बापटांनी यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पुण्यातील मंगेशकर रूग्णालयाकडून तासाभरात मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिक माहिती मिळू शकणार आहे.
खासदार गिरीश बापट हे आयसीयूमध्ये आहेत. त्यांची परिस्थिती चिंताजनक असून ते लाईफसपोर्ट वर आहेत. दीनानाथ रुग्णालयातर्फे माहिती मंगेशकर रुग्णालयाचे अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माहिती दिली आहे.
कसबा विधानसभेच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीसाठी खासदार गिरीश बापट यांनी व्हिलचेअरवरून ऑक्सिजन सपोर्टवर येऊन सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास मतदान केले होते. भाजपच्या प्रचारादरम्यान बापट यांनी आजारी असून स्वतः मैदानात उतरून पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. यानंतर राष्ट्रीय अधिकार बजावण्यासाठी बापट हे मतदानासाठी पोहचले. कसबा निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनवली होती.
कसबा विधासनसभा मतदारसंघातून बापट १९९५ पासून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. २०१७ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यात सुमारे ५ लाखांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. तत्पूर्वी महापालिकेतही नगरसेवक म्हणून ते तीन वेळा निवडून आले होते.





