TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedअध्यात्म । भविष्यवाणीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

एका हातात लॅपटॉप, दुसऱ्या हातात कुराण, उध्वस्त होण्यापासून वाचवले जीवन, 6 लाख मुस्लिम महिलांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

मुंबई: तिहेरी तलाक कायदा करणे, कोरोना महामारीच्या काळात रेशन आणि वैद्यकीय मदत देणे तसेच मुलींना शिक्षण देणे यासह अनेक विकास योजना सुरू केल्याबद्दल मुस्लिम समुदाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चाहता झाला आहे. असे प्रतिपादन भाजप नेते व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केले. अराफत शेख यांनी पंतप्रधानांच्या कामांबाबत मोहीम सुरू केली होती. या जनजागृती मोहिमेअंतर्गत विविध समाजातील 11 लाख लोकांनी पोस्टकार्डवर संदेश लिहून पंतप्रधान मोदींचे आभार मानले. मुस्लिम समाजातील सुमारे 6 लाख महिलांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिले होते.

इतर समाजातील पाच लाख लोकांनीही पत्रे लिहिली. हे पोस्टकार्ड रमजान ईदच्या दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर हे पोस्ट कार्ड पंतप्रधान मोदींना पाठवले जाईल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button