Konkan Rain : अतिवृष्टीमुळे अस्मानी संकट, हवामान खात्याकडून ‘या’ तारखेपर्यंत रेड अलर्ट
![Konkan Rain: Crisis due to heavy rains, red alert from meteorological department till 'this' date](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Konkan-Rain.png)
सिंधुदुर्ग : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबई, पुण्यासह कोकणातही मुसळधार सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर आल्याने पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे जवळजवळ २७ गावाचा संपर्क तुटल्याची माहिती आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच ५ ते ९ जुलै या कालावधीत रेड अलर्ट दिला आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे सांगण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव बाजारपेठेत घुसले पाणी…
कुडाळ जिल्ह्यातील लघू पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले असून सकाळीपासून जिल्ह्यात पावसाची विश्रांती आहे. त्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. पण असं असलं तरी पुढील काही दिवस कोकणासाठी महत्त्वाचे आहेत.