TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
एका ६ वर्षीय बालकावर ग्राइंडिंग मशीन पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय बालकावर ग्राइंडिंग मशीन पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सांगवी परिसरात मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.
क्षणात मुलाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला आईने तात्काळ जवळच्या रुग्णालय दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.