Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय का? किती आमदारांचा पाठिंबा? अजित पवार म्हणाले..

मुंबई : अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचं बोललं जात आहे. मात्र राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही, असं शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून स्वत: अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांच्यासोबत किती आमदार आहेत याचंही उत्तर दिलं आहे.

अजित पवार म्हणाले, राजकीय जीवनात वैचैरिक भूमिका घेत असताना तुमच्यात मतमतांतरे असू शकतात. पण कुटुंब म्हणून तुमची वेगळी भूमिका असते. ही महाराष्ट्राची वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती आहे. राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, आता तुम्हाला जसं दिसतंय, त्यापद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचं काम सुरू आहे. प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणी काय मत व्यक्त करावं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राजकीय जीवनात काम करताना तुम्ही वैचारिक भूमिका मांडू शकता. तुमच्यात मतमतांतरे असू शकतात. तुमची वेगवेगळी भूमिका असू शकते. पण कुटुंब म्हणून आपली भूमिका वेगळी असते. ही आपली वर्षानुवर्षे चालत आलेली संस्कृती आहे.

हेही वाचा – रक्षाबंधन विशेष : जाणून घ्या राखी बांधतांना कोणत्या दिशेला असावे भावांचे तोंड व कशी बांधावी भावाला राखी?

राष्ट्रवादीत दोन गट आहेत की एकच आहे? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तिथे आम्ही आमची भूमिका मांडली आहे. येत्या काळात निवडणूक आयोग त्यासंदर्भात आपला निर्णय घेईल. आम्ही सगळ्यांनी बहुमताचा आदर करून जी भूमिका घेतली, ती भूमिका योग्य आहे, असं माझं मत आहे. राष्ट्रवादीतील किती आमदारांचा पाठिंबा आहे? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, जेवढे आमदार बरोबर असणं गरजेचं आहे. तेवढे आमदार माझ्याबरोबर आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button