Uncategorizedताज्या घडामोडी

रात्री जेसीबीमध्ये झोपला, पहाटे थेट मृतदेह सापडला, पाहा नेमकं काय घडलं?

अकोला: अकोल्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला. यादरम्यान, अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर असलेला एक युवक वाहून गेला. हा युवक काटेपूर्णा कुरणखेड परिसरातील एका मोठ्या नाल्याच्या परिसरात १७ जूनच्या रात्री जेसीबीमध्ये झोपलेला होता. नाल्यातून आलेल्या प्रचंड पाण्याच्या लोढ्यांमध्ये रात्री दीडच्या सुमारास अचानक जेसीबी कोसळली. यामध्ये हा युवक वाहून गेला. तर तीन जण सुरक्षित बाहेर निघाले. दरम्यान, आज पाहटेच्या सुमारास वाहून गेलेला युवकाचा मृतहेद आढळून आला.

अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून या मार्गावर कुरणखेड काटेपूर्णा नदीच्या जवळ एक मोठा नाला आहे. इथे गुरुवारी दिवसभर दोन जेसीबीद्वारे काम सुरू होते. त्याच रात्री काम आटोपल्यानंतर चार मजूर याच जेसीबीमध्ये झोपी गेले. एका जेसीबीमध्ये दोन मजूर होते. रात्री पावसाचा जोर वाढला. नाल्याचा पाण्याचा ओढा जेसीबीपर्यंत पोहचला.

मशीन हळुहळू पाण्यामध्ये जात असल्याचा भास एकाला झाला. त्याने आपल्या जेसीबीमध्ये असलेल्या व्यक्तीला उठवून बाहेर काढले. त्यांनी दुसऱ्या जेसीबीमध्ये झोपलेल्या मजूरांना उठविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला कसेतरी बाहेर काढण्यात यश आले. पण, दुसरा प्रचंड झोपेत होता, त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना जेसीबी उलटला. यामुळे युवक पाण्यामध्ये वाहून गेला. सचिनकुमार ओमप्रकाश प्रसाद (वय १८) असं या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

या घटनेमधील चारही व्यक्ती बिहार येथील आहेत. या तिघांनी झालेला प्रकार तत्काळ मालकांना सांगितला. मात्र, गुरूवारच्या रात्री पावसाच्या जोर अधिक असल्यामुळे शोधकार्य हाती घेता आले नव्हते, काल सकाळपासून कुरणखेड परिसरातील दोन आपत्कालीन पथक आणि पोलिसांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. यामध्ये चार जेसीबी शोधकार्यात होत्या. अखेर आज पाहटे सचिनकुमार याचा मृतदेह हाती लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button