Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

RBI सारख्या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेत रघुराम राजन यांना मिळाली महत्वाची जबाबदारी

Raghuram Rajan : अमेरिकी फेडरल रिझर्वने मौद्रिक धोरण समीक्षेसाठी पाच प्रमुख टास्क फोर्सची स्थापना केली आहे. यात भारतीय वंशाच्या तीन एक्सपर्ट्सचा समावेश केला आहे. भारतीय रिझर्व बँकेचे माजी गर्वनर रघुराम राजन, हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या अर्थशास्त्रज्ञ राज चेट्टी आणि मायक्रोसॉफ्टच्या कार्यकारी अधिकारी आशा शर्मा यांचा टास्क फोर्समध्ये समावेश केला आहे. फेडरल रिझर्वचे नवीन चेअरमन केविन वार्श यांनी मॉनिटरी पॉलिसी बनवण्याच्या महत्वपूर्ण क्षेत्रासाठी ही टास्क फोर्स बनवली आहे. यात कम्युनिकेशन, बॅलन्स शीट पॉलिसी, डेटा, प्रोडक्टविटी अँड जॉब, इन्फ्लेशन फ्रेमवर्क अशा विषयांचा समावेश आहे.

रघुराम राजन हे बॅलन्स शीट निती टास्क फोर्समध्ये आहेत. या पॅनलमध्ये हार्वर्डचे अर्थशास्त्री करेन डायनन आणि फेडर रिझर्वचे माजी गर्वनर जेरेमी स्टीन यांचा समावेश आहे. ही टास्क फोर्स फेडरल रिझर्वची वर्तमान बॅलन्स शीट व्यवस्था खर्च, लाभ याचा तपास करेल. राजन यात एक्सपर्ट म्हणून मदत करतील. त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. जागतिक अर्थव्यवस्था आणि मॉनिटीरी पॉलिसीचे ते तज्ज्ञ मानले जातात.

हार्वर्ड विद्यापीठाचे प्रसिद्ध अर्थशास्त्री राज चेट्टी यांना डेटा टास्क फोर्समध्ये नियुक्त करण्यात आलय. या पॅनलमध्ये डग मॅकमिलन आणि शिकागो विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्री केविन मर्फी यांचा समावेश आहे.

हेही वाचा –  ‘किंग’ कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! कुमार संगकाराला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

हा टास्क फोर्स फेडरल रिझर्वच्या धोरणात्मक निर्णयांसाठी जो आर्थिक डेटा वापरला जातो, त्याची गुणवत्ता आणि वेळ यात अजून कशी सुधारणा होईल, यावर लक्ष देईल. चेट्टी हे रियल टाइम आणि प्रशासनिक डेटाचा वापर करुन इकोनॉमिब मोबिलिटी, असमानता आणि लेबर मार्केटचा अभ्यास करण्यासाठी ओळखले जातात.

मायक्रोसॉफ्टच्या कार्यकारी अधिकारी आशा शर्मा यांना प्रोडक्टिविटी आणि जॉब्स टास्क फोर्समध्ये नियुक्त करण्यात आलय. या पॅनलमध्ये मार्क एंड्रीसन आणि स्टॅनफोर्डचे अर्थशास्त्री चार्ल्स आय जोन्स यांचा सुद्धा समावेश आहे. हा टास्क फोर्स AI सह न्यू जनरल पर्पज टेक्नोलॉजीजच्या आर्थिक प्रभावाचा अभ्यास करेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button