चिखलीतील ३.३९ हेक्टर जागेवर साकारणार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तालय
भाजप नेते आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पोलीस आयुक्तालयाची मुहूर्तमेढ

राज्यातील अत्याधुनिक पोलीस आयुक्तालयाचा मान
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पर्यावरण पूरक इमारतीचे आज (दि.6) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होत असून, सुरक्षित आणि गुन्हेगारी मुक्त पिंपरी चिंचवड शहराबाबत भाजपने दिलेला शब्द पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब केला असल्याचे भाजपा नेते व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहराला आता अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय मिळणार आहे. चिखली येथे ३.३९ हेक्टर जागेवर १८०.६२ कोटी रुपयांच्या खर्चातून हे आयुक्तालय उभारले जाणार आहे.
हेही वाचा – शंभर थकबाकीदारांकडे 334 कोटींचा कर थकीत
भाजपा नेते आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षात सातत्यपूर्ण शहराची सुरक्षितता आणि गुन्हेगारी मुक्त वातावरण याबाबत पावले उचलली.या शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असावे अशी मागणी भाजपच्या माध्यमातून वारंवार करण्यात आली.त्यानंतर 2015 मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा विषय भाजपच्या माध्यमातून मार्गी निघाला. आता शहरासाठी स्वतंत्र, अद्यावत आणि पर्यावरण पूरक असे पोलीस आयुक्तालय साकारले जात आहे.
कुठे असेल आयुक्तालय
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एमएनजीएल पेट्रोल पंपासमोर, चिखली येथे जागा मंजूर करण्यात आली. या नवीन इमारतीत विशेष शाखा, गुन्हे शाखा, महिला सहायक कक्ष, जेष्ठ नागरिक कक्ष, नियंत्रण कक्ष, सीसीटीव्ही रूम, सोशल मीडिया लॅब आणि अन्य महत्त्वाच्या विभागांसाठी जागा असणार आहे. पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ही इमारत असणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
आजचा दिवस पिंपरी चिंचवड शहरासाठी नक्कीच वेगळा आहे. शहरामध्ये अद्यावत पोलीस आयुक्तालय असणे ही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि भयमुक्त वातावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. पोलीस आयुक्तालयाबरोबरच
देहूरोड पोलीस स्टेशन येथे वारकऱ्यांसाठी ११ कोटी रुपयांच्या खर्चातून विश्रामगृह बांधले जाणार आहे. महाळुंगे येथे २० गुंठे जागेवर १८.६६ कोटी रुपयांच्या खर्चातून औद्योगिक पोलीस संकुल उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी चाकण इंडस्ट्रियल असोसिएशनकडून सीएसआर फंडातून निधी मिळाला आहे.– विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर