इंद्रायणी नगर प्रभाग ८ मध्ये भाजपाची जोरदार पदयात्रा; आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत ‘महाविजय संकल्प’

भोसरी :भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणी नगर, संतनगर, भोसरी) येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा उत्साहात पार पडली. भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत भाजपच्या चारही उमेदवारांचा ‘महाविजय संकल्प’ करण्यात आला.
या पदयात्रेत आमदार महेशदादा लांडगे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भाजपा उमेदवार डॉ. कांबळे सुहास लक्ष्मण, सौ. लोंढे नम्रता योगेश, सौ. लांडगे नीलम शिवराज, श्री. मडिगेरी विलास हनुमंतराव यांच्यासाठी जनतेचे आशीर्वाद मागितले. विकासकामांचा लेखाजोखा मांडत आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांकडून पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा – मिशन-PCMC: राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड हमीपत्र जाहीर!
प्रभाग क्रमांक ८ साठी भाजपाचे अधिकृत सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉ. कांबळे सुहास लक्ष्मण (अनु.क्र. २ अ), सौ. लोंढे नम्रता योगेश (अनु.क्र. २ ब), सौ. लांडगे नीलम शिवराज (अनु.क्र. ४ क) आणि श्री. मडिगेरी विलास हनुमंतराव (अनु.क्र. २ ड) हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
पदयात्रेदरम्यान “कमळ” हेच विकासाचा मार्ग असून विश्वासाची हमी असल्याचा संदेश देण्यात आला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत ‘महाविजय संकल्प’ करण्यात आला. येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपाला मोठे यश मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


