Uncategorized

इंद्रायणी नगर प्रभाग ८ मधील भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात घेतली आघाडी

मिशन- PCMC : प्रभागाच्या विकासासाठी ‘‘कमळ’’ ला साथ देण्याचे आवाहन

पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा रंगात आला असताना प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. सेक्टर, बालाजी नगर परिसरात घेतलेल्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास हेच आमचे खरे बळ असल्याची भावना भाजपच्या उमेदवारांनी व्यक्त केली.

पार्लमेंट ते पालिका राहिलेल्या भाजप पक्षाची विकासाची सातत्यपूर्ण वाटचाल, विश्वासार्ह कार्यपद्धती आणि सक्षम नेतृत्वासाठी कमळ चिन्हाला साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी उमेदवारांनी नागरिकांना केले. होम टू होम, सोसायटी भागात जाऊन मतदारांशी संवाद साधत समस्यांची व नवीन सूचनांची माहिती घेऊन त्यावरील उपाययोजनांची हमी देण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात आला.

हेही वाचा –  प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचा प्रचार जोरात; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगर

(अ) डॉ. सुहास लक्ष्मण कांबळे

(ब) सौ. नम्रता योगेश लोंढे

(क) सौ. निलम शिवराज लांडगे

(ड) श्री. मडिगेरी विलास हनुमंतराव

हे उमेदवार मैदानात असून, प्रभागातील विकासकामे गतीमान करण्यासाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आगामी निवडणुकीत नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद सकारात्मक असून विजय निश्चित असल्याचा विश्वासही भाजप पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

प्रचारदौऱ्याचे नेतृत्व भाजपचे उमेदवार विलास मडिगेरी करत असून, त्यांनी आतापर्यंत प्रभागात केलेल्या विविध विकासकामांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. रस्ते विकास, डांबरीकरण व मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी मडिगेरी यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका रहिवाशांनी विशेषत्वाने अधोरेखित केली. सेक्टर २ मधील श्री समर्थ कॉलनी ते श्री तिरुपती बालाजी चौक येथे करण्यात आलेले डांबरीकरण, सेक्टर ३ मधील हॉटमिक्स पद्धतीने झालेले रस्त्याचे काम, तसेच सेक्टर ४ मधील महाराज चौक ते गायत्री कुंज परिसरातील रस्ते दुरुस्ती आणि आरटीओ कॉर्नर ते स्नेहदीप सोसायटी दरम्यान करण्यात आलेले डांबरीकरण ही महत्त्वाची विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button