Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Bhandara Fire: राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, राजकीय नेत्याकडून हळहळ व्यक्त; तात्काळ चौकशीचे आदेश

महाराष्ट्रातील भंडारा येथे घडलेल्या घटनेमुळे देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. ज्यानंतर एकच आक्रोश या परिसरात पाहायला मिळाला.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळंच ही घटना घडल्याचे गंभीर आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केले. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटनेचा आढावा घेतला आहे. राज्य शासनाकडून या घटनेच्या तात्काळ चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटद्वारे हळहळ व्यक्त केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button